Wednesday, July 28, 2010

काय हरवले ?

काय हरवले ? कसे सांगू काय हरवले ते ! काही क्षण...
तुझा स्पर्श.. तुझा गंध... व कोठे तरी तुला देखील..

हे असेच असते माहीत असून देखील अनोळखी मार्गावर मी नेहमीच पाऊल टाकतो काय मिळते मला काय माहीत पण सुखाच्या काही क्षणासाठी मी माझे प्राण देखील टाकतो.. वाटेवर.. सरळ चालणे मला जमतच नाही.. काय करु जन्माची खोड.. आता सुटेल लवकरच.. असाच कुठला तरी क्षण मला ही घेऊन जाईल बरोबर जशी तु गेलीस.. कळत नकळत.

कधी तरी असाच ... ग्लास हाती घेऊन बसतो मी.. कुठले तरी गाणे पीसीवर चालू असते... व कळत न कळत आश्रु डोळ्यातून. सवय आहे आजकाल मला त्याची.. सुखाची सावली असो वा दुखःची झळ... माझ्यासाठी तूच.. मला माहीत आहे तुला मी आठवणे अशक्य आहे... ! पण कधी वाटते... अशीच तु देखील बसलेली असशील संध्याकाळी.. काहीतरी निवडत.. तांदुळ साफ करत.. डोळ्यावर येणा-या केसांना दुर सारत... बागड्यांचा किणकिटाट.. होत असेल.. तेव्हा कधी तरी.. तुला मी आठवत असेनच.. काही क्षणतरी नक्कीच... शक्यतो नाही देखील...माहीत आहे..

सर्व काही विसरणे तुला शक्य आहे हे मला माहीत आहे.. तशी तु मनाने खुप खंभीर.. पण तरी ही परवा तुला माझी आठवण आलीच असेल नाही.. तुझ्या लग्नाचा वाढदिवस... कितवा.. आठवत नाही आता.. पण तुला मी नक्कीच आठवलो असेल.. जेव्हा तुझ्यासाठी तो आनंदाचा दिवस तेवढाच माझ्यासाठी देखील.. तुझं लग्न व माझा वाढदिवस.. ! एकाच दिवशी. म्हणून तर मी म्हणत असे तुला की तु मला असे काही देणार आहेस जे मला जन्मभर लक्ष्यात राहील.. भेटलं मला ते... एक भळभळती जख्म... अशीच जर रक्त वाहत नसेल तरी ही मी स्वतःच्या नखाने.... !

मला वाटले होते तुला विसरणे सहज शक्य आहे.. असेच काही क्षण निघून जातील एवढाच वेळ मला हवा.. पण आता वर्षानु वर्ष गेली.. पण तुला विसरणे सोड... प्रत्येक नवीन जख्म पण तुझीच आठवण करुन देते... ! प्रेमाला बंध नाही हे मला ही माहीत आहे.. तु माझ्यापासून दुर आहेस हे माहीत आहे मला... फक्त सात पाऊले.. तरी ही ... ती सात पाऊले माझ्यासाठी सात जन्माची आहेत.. हेच मी विसरु शकत नाही आहे... !

खुप जणांनी प्रयत्न केला बरोबर चार पाऊले चालण्याचा.. कधी नशीबाने तर थट्टा केली... तर कधी मध्येच निसटुन जाणा-या हातांनी.. चालायचेच.. ! सगळ्यांना तुझी सर येणे शक्य आहे काय... काही प्रश्नांची उत्तरे मला माहीत आहेत.. तरी ही मी त्या प्रश्नाना मी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.. प्रत्येक वेळी.. नवीन उत्तर... ! हरकत नाही.. चालेल मला.. पण कधी तरी सात पाऊले तुझी संपल्यावर आठवण ठेव... मी उभा असेन असाच कोठे तरी.. तळपत्या उन्हामध्ये.. तुझी वाट पाहत.. नेहमी प्रमाणेच !

Tuesday, July 27, 2010

माझ्या डायरीतली काही पानं .............

प्रिय

तुला प्रिय म्हणण्याचा अधिकार फक़त मी स्वतालाच देतो, माहीत नाही का पण तू माझ्यापासून दूर जात आहेस अस मला वाटत आहे.
रागऊ नकोस ह... आठवते का तुला किती काळजी करायाचिस माझी.
भेटण्याची इच्छा नसेल ना तर कारणे भरपूर असतात ग पण माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असेल ना अस्तित्वात नसलेल्या गोष्टीचाही शोध लागतो आणि इथे तर प्रश्न आहे अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा.
अवेळी येणारा आठवणींचा पूर अजूनही सुरुच आहे तुझ नि माझे प्रेम सुद्धा या आठवणिनसारखे, आकाशात चांदणे चमकले की तुझी आठवण अजुनाच जाणवायला लागते, खरच आजही सांजवेळी अन्धारुन आलेल्या क्षणी तुझा धूसर, अंधुक चेहरा समोर नजरेसमोर येतो, कळ्याशार रात्रीसुद्धा तुझा निरागस चेहरा डोळ्यासमोरून हालता हलत नाही, सुखात सारेच जन सोबत असतात ग पण खरी गरज असते ती दुखात, खरे सांगू आज-काल जरा जास्तच अस्वस्थ वाटतय, मला गरज आहे तुझया सहवसाची, मला समजून घेणारे कुणीतरी, जिवा-भावच कुणीतरी हवाय, हक्काच हवाय.............
तुझ्याशिवाय जगणे म्हणजे केवळ वैराण वादळ, तू म्हणालिस ना की आपले काही होणार तेव्हापासून तर अगदीच एकटा पडल्यासारखा झालोय मी, मला अस वाटायला लागलाय की नसतोच जर प्रेमात पडलो कधी तर...........
आपण जर एकजीव नाही होऊ शकलो तर विसरू शकशिल का मला, एक सांगू.... विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करशील तू, पण विसरू शक
शील का मला, नाही ग शोन्या काय काय विसर्शील तू, हातात गुंफलेले हात, तुझ्या ओठांवर टेकलेले माझे ओठ, तुझया रेशमी केसातून फिरणारी माझी बोट, लाडात येऊन केलेली मस्करी, तू केलेली आक्टिंग, मी केलेले नखरे काय काय विसर्शील ग तू......
भेटण्यासाठी पहिलेली वाट, अश्रूंचे खळखळनारे पाट, हृदयात ओथम्ब्लेल प्रेम, ओठवरून अलगद टिपलेला तो पाण्याचा थेंब, तो रुसवा तो फुगवा, सहवास जो हवा हवा, डोल्यातील व्याकूलता, श्वासाची अधिरता ...............विसरू शाक्शिल का मला.......
मला माहीत आहे विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करशील तू, आठउ लागलो मी की कसावीस होशील तू, भटकालात शोधाशील मला तू, नाहीच सापडलो तर विरघलुन जशील तू, माझ्या मिठीत येण्यास बेचैन होशील, तुझी ती तडफड नाही ग बघू शकनार मी, कारण दररोज तोच अनुभव घेत आहे मी, तडफडतोय मी........
एकाकी......
एकटाच..............
एक विचारू जरी तू माझी नाही ना होऊ शकली तरी एकदा मला भेटायला येशील का?
शरीरातला प्राण जाण्या अगोदर............
अंगणातला गुलमोहर फूलन्या अगोदर.......
डोल्यातील अश्रू सुकन्या अगोदर.....
फक्त एकदाच येशील का.........
पुन्हा परतून लांबवर चालत येऊ नकोस, फक्त एकदा मागे वळून बघ.............
मी आहे इथेच......
अगदी एका श्वासाच्या अंतरावर.....
जेव्हा वॅळशील अलगद मला बिलगशील.......
हा लोभ नाही, मोह नाही आहे फक्त तुझ्यावरचे निस्मीत प्रेम.......

बस्स झले आता आज पण जास्तच झाले ना शोनू.....
मंद नि रडत नको बसू आता काम करा काम.....
नि मी झोपतो आता घरी जाउन मस्त..........

टेक केअर....
लकि